GCAD Gallery
←BACK
रंगरेखा अंतर्गत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकरिता 'केव्ज सिटी क्लब' तर्फे 'अँटी रॅगिंग' दिनानिमित्त 'सायबर क्राईम' विषयी जागृती मार्गदर्शनपर व्याख्यान दिनांक १८/०८/२०२३ रोजी दुपारी ३ वाजता महाविद्यालयामध्ये रंगरेखा अंतर्गत, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकरिता 'केव्ज सिटी क्लब' तर्फे 'अँटी रॅगिंग' दिनानिमित्त 'सायबर क्राईम' विषयी जागृती करण्याकरिता एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता प्रा.रमेश वडजे हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चरणसिंग कायते, (Head and Assistant professor, Department of Digital and Cyber Forensic Government Institute of forensic science, Chhatrapati Sambhajinagar व केव्ज सिटी क्लब चे अध्यक्ष श्री.बिपीन निर्मळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन व त्यांची ओळख करून देऊन झाली.
इंटरनेट क्रांती ही आजवरीची सर्वात मोठी क्रांती मानली जाते. इंटरनेटने सर्वत्र क्षेत्रात प्रवेश केला आहे. ऑनलाईन बॅकींग, ऑनलाईन खरेदी, मेसेजिंग, फेसबुक, व्हॉटस्ॲप, ट्विटर, व्हीडीओ कॉल इत्यादी गोष्टीमुळे देशाच्या सिमारेषाही पुसून गेल्या असून जगातले लोक खूप जवळ आले आहेत. वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि खासगी गोपनियता याला मोठा धोका निर्माण केला आहे. इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आवाहन सध्या आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करू न शकणारे प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. आधुनिक तंत्रज्ञान वाढत असताना देशात सायबर गुन्हेही वाढत आहेत. वाढती सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) चिंतेती बाब आहे. लोकांमध्ये याविषयी माहिती नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होत आहेत म्हणून लोकांमध्ये जागरुकता होणे महत्त्वाचे आहे. डॉ.कायते यांनी सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच बँकेचा युजर आयडी, ए.टी.एम., डेबिट कार्डचा क्रमांक व पिन पासवर्ड, ओटीपी कोणत्याही व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन केले, तसेच सायबर गुन्हे कसे घडतात त्यांची कार्यपद्धती कशी आहे, सायबर बुलिंग म्हणजे काय व त्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याबद्दलचीही माहिती दिली.तसेच सायबर गुन्हेगारी विषयी असलेल्या कायद्याबाबत व आधार क्रमांकाचा गैरवापरातून करण्यात आलेल्या फसवणुकीबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांशी अत्यंत खेळीमेळीने प्रश्नोत्तरे करून डॉ.कायते यांनी मार्गदर्शन केले.