'अजंता एलोरा आर्ट रेसिडेन्सी' तर्फे 'मेटामॉर्फोसिस ऑफ आर्ट’या विषयावर एक परिसंवाद दिनांक ०३/१०/२०२३ रोजी दुपारी ३.00 वाजता शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे रंगरेखा अंतर्गत, विद्यार्थ्यांकरिता 'अजंता एलोरा आर्ट रेसिडेन्सी' तर्फे 'मेटामॉर्फोसिस ऑफ आर्ट’या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.आर्ट रेसिडेन्सीची संकल्पना म्हणजे कलाकारांना सांस्कृतिक वारसा, कलात्मक परंपरा, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्र, पर्यावरण, पर्यावरणशास्त्र आणि समाजातील गुंतागुंतीचे नाते आणि त्यांचा ऐतिहासिक वारसा त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तींद्वारे शोध घेण्यासाठी आमंत्रित करणे. रेसिडेन्सी चा उपक्रम बहुतांशी सांस्कृतिक पद्धतीने भरलेल्या घटनास्थळी होतात जसे की, ऐतिहासिक स्थळे, पारंपारिक समुदाय किंवा समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले प्रदेश. अजंता एलोरा आर्ट्स रेसिडेन्सीचे उद्दिष्ट कलाकार रेसिडेन्सी तयार करण्याचे आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना कलाकृती निर्मितीसाठी, प्रदर्शनाची थीम, उत्सव आणि सांस्कृतिक संवर्धन, वारसा, क्रॉस-कल्चरल एक्सचेंजला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलांच्या बहुविद्याशाखीय प्रकारांद्वारे सामाजिक बदल घडविण्यासाठी हा उपक्रम सुरु केलेला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता प्रा.रमेश वडजे हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून श्री मधू राघवेंद्र(कवी), श्रीमती.देवी गांगुली (प्रिंट मेकर) व श्री.प्रदीप गुप्ता (समकालीन नर्तक) हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन व त्यांची ओळख करून देऊन झाली. श्री.मधू राघवेंद्र यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना या उपक्रमाविषयी माहिती दिली व त्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.