दिनांक 4 आक्टोंबर ते 7 आक्टोंबर 2023 या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आयोजित युवक महोत्सव 2023 मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आठ कलाप्रकारात सहभाग नोंदविला. त्यात श्री.विशाल घुगे यांने कोलाज कलाप्रकारात प्रथम पारितोषिक, कु.गौरी पिसे यांनी मृदमुर्ती कला प्रकारात द्वितीय पारितोषिक, कु.दिपाली तायडे यांनी पोस्टर कला प्रकारात द्वितीय पारितोषिक, श्री.विनय डोंगरे यांनी रांगोळी कला प्रकारात तृतीय पारितोषिक, कु.रागिणी इंगळे यांनी व्यंगचित्रकला प्रकारात द्वितीय पारितोषिक, श्री.आशिष कोठारे यांनी निसर्गचित्र या कला प्रकारात द्वितीय पारितोषिक, श्री.राहूल हरणे यांनी स्पॉट फोटोग्राफी कला प्रकारात द्वितीय पारितोषिक, तर श्री,राहूल हरणे, श्री.सागर वाघमारे, श्री.आशिष कोठारे यांनी सांघीक शॉर्ट फिल्म या कला प्रकारात तृतीय पारितोषिक प्राप्त केले तर उपयोजित कला विभागाच्या अध्यापिका श्रीमती अश्विनी सालोडकर यांनी संघप्रमुख म्हणून काम पाहिले.